Monday, December 23, 2024
HomeBlogइचलकरंजी प्रेस क्लब अध्यक्षपदी मयुर चिंदे; अरुण काशीद उपाध्यक्ष

इचलकरंजी प्रेस क्लब अध्यक्षपदी मयुर चिंदे; अरुण काशीद उपाध्यक्ष

ताजी बातमी टिम

येथील इचलकरंजी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी मयूर चिंदे यांची तर उपाध्यक्षपदी अरुण काशीद यांची निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी राजेंद्र होळकर यांची तर खजिनदारपदी शैलेंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली.

इचलकरंजी प्रेस क्लबच्या नूतन कार्यकारिणी निवडीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत सदर निवडी एकमताने करण्यात आल्या.अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष शरद सुखटणकर होते.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे, संजय खूळ, अजय काकडे, सुनिल मनोळे, संजय कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विषयांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. तसेच मावळते अध्यक्ष शरद सुखटणकर यांनी मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी नूतन कार्यकारिणी एकमताने जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी मयूर चिंदे यांची, उपाध्यक्षपदी अरुण काशीद यांची, सचिवपदी राजेंद्र होळकर, खजिनदारपदी शैलेंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली. यानंतर नूतन पदाधिका-यांचा पत्रकार, शरद सुखटणकर, दयानंद लिपारे, संजय खूळ यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नूतन अध्यक्ष मयूर चिंदे , उपाध्यक्ष अरूण काशीद यांच्यासह अन्य नूतन पदाधिका-यांनी पुढील वर्षभराच्या कालावधीत पत्रकार बांधवांच्या विकासाबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून विविध कार्यक्रम राबवू, अशीही ग्वाही दिली. या बैठकीस सदस्य रविकिरण चौगुले, अरुण वडेकर, अमर चिंदे, संदिप जगताप आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -