पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पीएम सुर्य घर : मोफत वीज योजनेची(Electricity) घोषणा केली आहे. देशातील एक कोटी लोकांना दरमहिना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. सौरउर्जा आणि प्रगतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पीएम सूर्य घर: मोफत वीज योजनेची(Electricity) घोषणा केली. या प्रकल्पात ७५,००० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
पंतप्रधान मोदींना सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘या प्रकल्पात ७५ हजार कोटी रुपयांची गु्ंतवणूक केली जाणार आहे. दरमहा १ कोटी घरांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट आहे’, असं त्यांनी म्हटलं आहे.या योजनेमुळे लोकांचे उत्पन्न वाढेल, वीज बिल कमी येईल, रोजगार निर्मिती होईल असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सोरऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठ http://PMSuryaGhar.gov.in या वेबसाइटवर नागरिकांना अर्ज करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
योजनेसाठी असा करा अर्ज
-या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल.
-तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुमचे स्वतःचे अकाउंट तयार होईल. तेथे तुम्हाला लॉग इन करावा लागेल. त्यानंतर वीज ग्राहक नंबर, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि आवश्यक माहिती भराली लागेल. त्यानंतर हा फॉर्म सबमिट करावा लागेल.
-तुमच्या परिसरातील नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुम्हाला विक्रेत निवडावा लागेल.
-डिस्कॉमकडून मंजुरी मिळताच तुम्ही सोलार प्लांट स्थापन करु शकतात. सोलार प्लांट बसवल्यावर त्याची सर्व माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर सबमिट करावी लागेल. त्यानंतर मीटरसाठी अर्ज कराला लागेल.
-तुम्हाला बँक खाते आणि कँसल्ड चेक सबमिट करावा लागेल. त्यानंतर सरकारकडून मिळणाऱ्या या योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकता.