मित्रांनो, रेशन कार्ड म्हणजे मोफत मध्ये धान्य वाटप केले जाणारे साधन असे आपण म्हणू शकतो. तुम्हाला तर माहीतच आहे की, रेशन कार्ड मार्फत अनेक प्रकारचे लाभ सर्वसामान्य माणसांना होत आहे. या कार्ड अंतर्गत मोफत मध्ये अनेक प्रकारचे योजनांचा लाभ आपल्याला घेता येतो. या कार्डमार्फत मुख्य म्हणजे शिधावाटप केले जाते. aanadacha shidha
त्यामध्ये तांदूळ, गहू, डाळी, कडधान्य अशा आपल्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश केला जातो. याच रेशन कार्ड धारकांना अनेक प्रकारचे वस्तू देखील मोफत मध्ये दिला जातात. सरकार कडून रेशन कार्डधारकांना गुढीपाडव्याच्या निमित्त काही वस्तू मोफत मध्ये दिला जाणार आहे. त्या वस्तू कोणत्या? त्या वस्तू कधी मिळणार? त्याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. Ration card aanadacha shidha
गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने सरकारने ही योजना राबविलेली आहे. या योजनेमध्ये रेशन कार्डधारकांना काही वस्तू या मोफत मध्ये दिल्या जाणार आहेत. या योजनेला महाराष्ट्र शासनाने ‘आनंदाचा शिधा’ असे नाव दिलेले आहे. राज्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरणाचा निर्णय घेतला आहे.Ration card aanadacha shidha
या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी १ किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधा जिन्नस समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात येणार आहे.
राज्यातील सुमारे २५ लक्ष अंत्योदय अन्न योजना, १.३७ कोटी प्राधान्य कुटुंब व ७.५ लक्ष शेतकरी योजनेतील शिधा पत्रिकाधारक अशा सुमारे १.६९ कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्यात येईल.
यासाठी ५५० कोटी ५७ लाख रुपये इतक्या खर्चास मंजूरी शासनाने दिलेली आहेत. याचा लाभ सर्व रेशन कार्ड धारकांना होणार आहे. हा लाभ तुम्हाला 15 एप्रिल नंतर दिला जाईल.
अशाप्रकारे तुम्ही देखील रेशन कार्ड धारक असाल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 15 एप्रिल नंतर तुम्हाला देखील या काही वस्तू मोफत स्वरूपात दिली जातील.Ration card aanadacha shidha