येथील डेक्कन सूतगिरणी समोर एका ज्वेलर्स दुकानाच्या मालकास आणि त्यांच्या भावास शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी शहीदा मोमीन, वहिदा किस्मतगार, शब्बी किस्मतगार, शहीदा यांचे पती आणि अन्य तीन अनोळखी साथीदार (सर्व रा. फकीर मळा, जवाहरनगर) अशा सातजणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.याबाबत शहाजी पांडुरंग खोत (वय ४७) यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मंगळवार ता. २७ रोजी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास वरील संशयितांनी खोत यांच्या ज्वेलर्स दुकानात येऊन सन २०१८ साली दुरूस्तीला दिलेले पजण परत मागितले. त्यावर दुकानदार खोत यांनी त्यासाठी दिलेली चिठ्ठी मागितली. त्यामुळे चिठ्ठीसाठी पजण देत नसल्याच्या गैरसमजुतीतून वरील संशयितांनी शहाजी आणि त्यांचा भाऊ विक्रमसिंह या दोघांना लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी पटीने मारहाण केली. तसेच दुकानाच्या काचा फोडून नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.