आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 यंदा जून महिन्यात होणार आहे. वर्ल्डकपचा थरार प्रथमच अमेरिकेत रंगणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज वर्ल्डकपचे संयुक्त यजमान आहेत. वर्ल्डकपचे आठ सामने न्यूयॉर्कमध्येही होणार आहेत. त्यापैकी सर्वांचे लक्ष लागलेला भारत-पाकिस्तान सामनाही न्यूयार्कमध्ये होणार आहे. यासाठी जय्यत तयारी गेल्या सहा महिन्यांपासून अमेरिकेत सुरु आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यासाठी तयारी मागील सहा महिन्यांपासून फ्लोरिडामध्ये सुरु आहे. न्यूर्यार्कमधील 34,000 प्रेक्षक क्षमतेचा नासाउ काउंटी इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सामना होणार आहे. हे मैदान आइजनहावर पार्कमध्ये आहे. स्टेडियममधील सर्व सामने ड्रॉप इन पिचवर होणार आहे. ड्रॉप इन पिच मैदानापासून दुसऱ्या ठिकाणी बनवली जाते आणि सामन्याच्या वेळी ती मैदानात आणली जाते. ही ड्रॉप इन पिच मैदानापासून 2000 किलोमीटर लांब असलेल्या फ्लोरिडामध्ये तयार केली जात आहे. त्याची तयारी मागील वर्षी डिसेंबर महिन्यापासून दहा पिच बनवण्याचे काम सुरु आहे. ही पिच ट्रक, क्रेन किंवा इतर साधनाद्वारे मैदानात आणली जाणार आहे.
का आले ड्रॉप इन पिचचे कल्चर
ड्रॉप-इन पिचचे कल्चर ऑस्ट्रेलियात सर्वात जास्त आहे. क्रिकेट ग्राउंड दुसऱ्या कार्यक्रमासाठी वापरता यावा, म्हणून ड्रॉप इन पिच तयार करण्याचे कल्चर आले. अमेरिकेतील या मैदानात म्युजिक कॉन्सर्ट, रग्बी आणि फुटबॉलचे सामने होतात. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार चार पिचे नासाउ स्टेडियममध्ये लावण्यात येणार आहे तर सहा खेळपट्टी जवळपास सरावासाठी ठेवण्यात येणार आहे. 1 ते 29 जून दरम्यान 20 वर्ल्ड कप अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये होणार आहे.
ड्रॉप इन पिज केरी पॅकरने 1970 च्या दशकात सुरु केली होती. वर्ल्ड सिरीज क्रिकेट सुरू केले तेव्हा त्यांनी अशा ड्रॉप-इन खेळपट्ट्या वापरल्या होत्या. आता ऑस्ट्रेलियामध्ये हिवाळ्यात ज्या मैदानावर फुटबॉलचे सामने होतात त्या मैदानावर क्रिकेटच्या हंगामात खेळपट्ट्यांचा वापर केला जातो.