टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी झाले असून पाच-पाच संघांचे चार गट आहेत. भारत अ गटात असून यात पाकिस्तानचा संघही आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात वेळेचा खूपच फरक आहे. त्यामुळे भारतीय वेळ लक्षात घेऊन त्याचं नियोजन केलं गेलं आहे. सराव सामन्यादरम्यान या तयारीचा ट्रेलर समोर येईल. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे सामने टीव्ही आणि मोबाईल लाईव्ह पाहण्यासाठी काय सुविधा आहे ते जाणून घेऊयात
तुम्हाला टी20 वर्ल्डकप स्पर्धा पाहण्यासाठी मोबाईल सोयिस्कर पडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सर्व प्रथम मोबाईलमध्य डिस्ने हॉट स्टार अॅप डाऊनलोड करा. कारण डिस्ने हॉट स्टारने वर्ल्डकपचे हक्क विकत घेतले आहेत.
डिस्ने हॉट स्टारने जाहीर केले आहे की, सर्व विश्वचषक सामने पूर्णपणे विनामूल्य पाहण्यासाठी उपलब्ध असतील. यासाठी तुम्हाला त्याची सदस्यता घेण्याची गरज नाही. डिस्ने हॉट स्टार ॲप डाउनलोड करावे लागेल आणि तुम्हाला विनामूल्य सामने पाहता येतील.
सामन्यांच्या वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, भारतात काही सामने सकाळी 6 वाजता सुरू होणार. तर काही सामने रात्री 8 वाजता सुरू होतात. जर टीम इंडिया सेमीफायनल किंवा फायनलमध्ये पोहोचली तर मॅच सुरू होण्याची वेळ बदलली जाईल. हे अपडेट नंतर केले जाईल.
26 मे नंतर जिओ सिनेमाऐवजी डिस्ने हॉट स्टारकडे जावे लागेल. इतकंच काय तर तुम्ही सराव सामने थेट पाहू शकता. भारत 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर 2024 च्या T20 विश्वचषकाचा रोमांचक प्रवास सुरू होईल.