इचलकरंजीकरांनो पाणी जपून वापरा : कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेस गळती
कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेस गळती लागल्यामुळे इचलकरंजी शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
शिरढोण कुरुंदवाड फाट्याजवळ ही गळती लागली असून काल मंगळावर पासून या कारणामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. याबाबतचे दुरुस्तीचे काम सुरू असून हे काम लवकरच पूर्ण होईल.
आणि त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल असे सांगून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.



