१२ वर्षीय मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी युवकास अटक केली.
प्रसाद गणेश गुरवळ (वय २०, रा. लक्ष्मीतीर्थ वसाहत, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद दनियल युवराज भोसले (वय ३७, रा. मंगेश्वर कॉलनी, उचगाव, कोल्हापूर) यांनी दिली आहे.
१२ वर्षीय मुलीला लग्नाचे अमिष दाखवून लालनगर येथून ३१ मे रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरातून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी प्रसाद गुरवळ याच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास पो. नि. प्रविण खानापुरे हे करत आहेत.