Monday, December 23, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाचा पराभवानंतर सेमीफायनलचे गणित, कंगारु टुर्नामेंटमधून बाहेर पडण्याचा धोका तर…

ऑस्ट्रेलियाचा पराभवानंतर सेमीफायनलचे गणित, कंगारु टुर्नामेंटमधून बाहेर पडण्याचा धोका तर…

मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ 2024 च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 22 जून रोजी आहे. हा सामना भारतीय संघाने जिंकला तर ऑस्ट्रेलियन संघ जवळपास स्पर्धेतून बाहेर पडेल, कारण नेट रन रेटही घसरेल.

 

T20 विश्वचषकाच्या सुपर-8 राऊंडमध्ये धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. अफगाणिस्तान संघाने इतिहास रचला आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये तो विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता, पण मॅक्सवेलने त्याच्याकडून विजय हिसकावून घेतला. मात्र, यावेळी अफगाणिस्तानने अशी कोणतीही चूक केली नाही आणि किंग्सटाउन येथे ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियासमोर संकट निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलिया संघ टी 20 मधून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पहिल्या गटात अशी परिस्थिती

टी 20 मध्ये सुपर आठ मध्ये आठ सामने झाले आहे. चार सामने बाकी आहेत. परंतु अजून एक संघ उपांत्यफेरीत दाखल झाला नाही. परंतु रविवारी ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तान संघाने पराभव केला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. सुपर 8 मधील ग्रुप 1 मधील पॉइंट्स टेबलनुसार, भारताचा संघ 2 सामन्यात 4 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया 2 सामन्यात 2 गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अफगानिस्तान संघही 2 सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या अफगाणिस्तानापेक्षा ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट चांगला आहे.

 

आता ऑस्ट्रेलियाचे गणित असे

 

मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ 2024 च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 22 जून रोजी आहे. हा सामना भारतीय संघाने जिंकला तर ऑस्ट्रेलियन संघ जवळपास स्पर्धेतून बाहेर पडेल, कारण नेट रन रेटही घसरेल. जर ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध हरला आणि अफगाणिस्तान संघाने बांगलादेशला पराभूत केले तर ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. यामुळे ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध सामना जिंकणे आवश्यक बनले आहे.

 

दुसऱ्या गटात काय परिस्थिती

T20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 च्या गट 2 गटात अशीच परिस्थिती आहे. दोन सामन्यांत दोन विजयांसह दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज 2 सामन्यांत 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड आहे, ज्याने एक सामना गमावला आहे. मात्र, वेस्ट इंडिजचा नेट रनरेट चांगला आहे. तर, अमेरिकेने दोन सामने गमावले आहेत. तो चौथ्या स्थानावर आहे. या गटातून दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यापैकी एक संघ बाहेर असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -