ताजी बातमी ऑनलाइन टीम
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचायतीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी जिल्ह्यातील सुमारे 81 बंधारे पाण्याखाली गेली आहेत.
आता यामध्ये नव्या अहवालानुसार एकसंबा दानवाड यादरम्यान असणारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे. याचा फटका प्रामुख्याने येथील शेतकरी वर्गाला बसत असून प्रवासी मंडळी ही अडचणीत आली आहे. आणि मुख्य म्हणजे कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना जोडणारा हा पूल असल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांना याचा फटका बसत आहे.