Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्र"दिवसभर कधीही बांधा लाडक्या भावाला राखी", रक्षाबंधनाला भद्रा काळ वर्ज्य नसल्याचं पंचांगकर्ते...

“दिवसभर कधीही बांधा लाडक्या भावाला राखी”, रक्षाबंधनाला भद्रा काळ वर्ज्य नसल्याचं पंचांगकर्ते मोहन दातेंचं स्पष्टीकरण

रक्षाबंधनापेक्षा (Raksha Bandhan) अधिक चर्चा होत आहे ती त्यादिवशी येणाऱ्या भद्रायोगाची… रक्षाबंधनासाठी भद्रा काळ हा वर्ज्य असल्याची सध्या चर्चा आहे. परंतु पंचागकर्ते दाते गुरूजी म्हणतात भद्रा योगात देखील तुम्हाला रक्षाबंधन साजरे करता येणार आहे. रक्षाबंधनाच्या वेळेबाबत लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे आणि याचे कारण दुसरे तिसरे कोणी नसून भद्राकाळ आहे. त्यामुळे रक्षाबंधन नेमके किती वाजता करायचे याबाबत लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र हा संभ्रम पंचागकर्ते मोहन दाते यांनी दूर केला असून सोमवरी ( 19 ऑगस्ट) दिवसभरात कोणत्याही वेळी आनंदाने साजरा करावा असे म्हणाले.

यंदाच्या रक्षाबंधनला भद्रा काळ वर्ज्य नाही तसंच मुहूर्ताचीही आवश्यकता नाही. त्यामुळे सोमवारी दिवसभरात कधीही राखीपौर्णिमा साजरी करता येईल, अशी माहिती प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. सध्या पौराणिक पद्धतीने सहसा रक्षाबंधन साजरी होत नाही. रक्षाबंधन हे आता सामाजिक उत्सव झाल्याने दिवसभरात सोयीने केव्हाही रक्षाबंधन करता येईल. मात्र ज्यांना पौराणिक पद्धतीने रक्षाबंधन साजरे करायचे आहे त्यांनी भद्रा काळ वर्ज्य करावा अशी प्रतिक्रिया मोहन दाते यांनी दिली.

 

रक्षाहोम करून राखी कशी बांधवी?

पारंपरिक पद्धतीने राखी बनवण्यासाठी तांदूळ, सोने आणि पांढऱ्या मोहऱ्या किंवा दुर्वा, अक्षता, केशर, चंदन, मोहरीचे दाणे एकत्र रेशमी कापडात पुरचुंडी बांधून त्याला रंगीत दोरा बांधून राखी तयार करावी. ती देवघरात कलशावर ठेवून तिची पूजा करावी. रक्षाहोम करून ही राखी बांधवी. भद्रा काळ हा 1 वाजून 33 मिनिटापर्यंत असल्याने त्यानंतर रक्षाबंधन साजरा करता येईल. अशी माहिती प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

 

दिवसभर साजरा करता येणार सण

होम हवन करून केलेल्या रक्षाबंधनासाठी भद्रा काळ हा वर्ज्य सांगितला आहे. मात्र आत्ता आपण जे रक्षाबंधन साजरे करताना आपण फॅन्सी राख्या बांधतो. त्यामुळे बहिणीने भावाला राखी बांधताना, मित्राने मित्राला बांधताना, समाजबांधवांनी ऐकमेकांना बांधताना भद्रा काळ वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सोमवारी रक्षाबंधन दिवसभरात कोणत्याही वेळी आनंदाने साजरा करावा असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी भाऊ-बहिणी दिवसभर रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -