Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगकेवायसीसाठी बँकांच्या बाहेर एक किलोमीटरपर्यंत रांग; लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी

केवायसीसाठी बँकांच्या बाहेर एक किलोमीटरपर्यंत रांग; लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बँक खाते केवायसी असल्याशिवाय अकाउंटवर पैसे येत नाही. यामुळे बँक खाते आधारही लिंक करून केवायसी करण्यासाठी लाभार्थी महिलांची मोठी गर्दी होत असून महिलांचे हाल होत आहेत.

 

नंदुरबार (Nandurbar) जिल्हा हा दुर्गम भागातून ग्रामीण भागात बँकांची संख्या कमी असल्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकांमध्ये महिला लाभार्थ्यांची त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी अर्ज भरले आहेत. यासाठी दिलेल्या बँक (Bank) खात्याचे केवायसी असणे गरजेचे आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली असली तरी या योजनेसाठी महिलांनी दिलेल्या बँक अकाउंट केवायसी आवश्यक आहे. यामुळे शहादा शहरातील बँकांमध्ये महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

 

पहाटेपासूनच बँकेबाहेर रांग

 

अगदी पहाटेपासूनच बँकांमध्ये केवायसी करण्यासाठी महिलांच्या रांगा लागत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. शहादा (shahada) शहरातील बँकांच्या बाहेर जवळपास एक किलोमीटर पर्यंत लाभार्थ्यांची लाईन पाहण्यास मिळाली. यामुळे सरकारने केवायसीसाठी वेगळी यंत्रणा उभी करून लाडक्या बहिणीचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी ग्रामीण भागातील महिलांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -