Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रसुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? नासाने बनवला प्लॅन, दिली ही तारीख

सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? नासाने बनवला प्लॅन, दिली ही तारीख

भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर अंतराळ स्थानकात अडकले आहेत. 5 जून रोजी रोजी हे दोन्ही अंतराळवीर अंतराळत झेपावले होते. त्यानंतर आठ दिवसात ते परत येणार होते. परंतु स्टारलाइनरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग सध्या तरी बंद झाला आहे. या अंतराळवीरांना पृथ्वीवर कधी आणणार? त्याची माहिती अमेरिकन अंतराळ संस्था नासाने दिली आहे.

नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासंदर्भात माहिती दिली. त्यांना आता स्पेसएक्स रॉकेटच्या माध्यमातून पृथ्वीवर आणण्यात येणार आहे. स्टारलाइनरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्याच माध्यमातून त्यांना परत आणणे अतिशय जोखीमचे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

फेब्रुवारी 2025 मध्ये परतणार

सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर यांचे हे वर्ष आता अंतराळ स्थानकातच जाणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये स्पेसएक्स क्रू ड्रॅगन अंतराळ यानातून ते पृथ्वीवर परत येऊ शकतात. हे यान पुढील महिन्यात अंतराळस्थानकाकडे झेपवणार आहे. या अंतराळ यात्रात चार सीट आहेत. त्यातील दोन सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासाठी रिकामी ठेवली जाणार आहे. तसेच स्टारलाइनर विना चालक दल अंतराळ स्थानकातून वेगळा होणार आहे अन् अंतराळवीरांशिवाय पृथ्वीवर परतणार आहे.

 

स्पेसएक्सला बोइंगचा सर्वात मोठा स्पर्धेक मानले जाते. परंतु बोइंगच्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सची निवड नासाने केली. 2016 मध्ये बोइंगने स्टारलाइनर विकसित केले होते. त्यासाठी 1.6 बिलियन डॉलर लागण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु त्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च लागला आहे.

 

नासाने बोइंगला दिला इशारा

नेल्सन यांनी ह्यूस्टनमधील एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते की, बोईंगचे नवीन सीईओ केली ऑर्टबर्ग यांच्याशी चर्चा केली. स्टारलाइनर सुरक्षितपणे परत आल्यावर त्यातील तांत्रिक बिघाडावर काम करण्याचे त्यांनी सांगितले आहे. बोईंग देखील त्यांच्या सर्वात महत्वाच्या उत्पादनांच्या, व्यावसायिक विमानांच्या उत्पादनात गुणवत्तेबाबत संघर्ष करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -