महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील 48 तासांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात IMD चा अंदाज काय?
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. शहर आणि उपनगरात मधूनमधून हलका ते मध्यम पाऊस/ मेघगर्जनेसह सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30°C आणि 27°C च्या आसपास असेल.
‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा धोक्याचा इशारा
कोकणाबाबत बोलायचं तर, कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.