आता 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कार्ड पेमेंटवर जीएसटी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
10 सप्टेंबर रोजी जीएसटी काऊन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय होऊ शकतो. क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा 2000 रुपयांपेक्षा कमी पेमेंटसाठी वापर केल्यास 18 टक्के जीएसटी लागू शकतो.
डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 18 टक्के जीएसटी लागू झाल्यास प्रत्येक ट्रान्झिशन्ससाठी 0.5 ते 2 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाते. बहुसंख्या व्यवहारांवर सरासरी 1 टक्के इतके शुल्क आकारले जाते.
समजा तुम्ही एक हजार रुपयांचे पेमेंट केल्यास त्यावर एक टक्का याप्रमाणे साधारण 10 रुपये आकारले जातात.
18 टक्के जीएसटी आकराण्याचे ठरल्यास हे शुल्क वाढून 11.80 रुपये एवढे होऊ शकते. ही वाढ फार कमी वाटत असली तर व्यापाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
यूपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर कोणताही जीएसटी लागू होणार नाही.