Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रसरकारने आणली मुलांसाठी नवी योजना, चिमुकल्यांचं भवितव्य होणार सुरक्षित; जाणून घ्या काय...

सरकारने आणली मुलांसाठी नवी योजना, चिमुकल्यांचं भवितव्य होणार सुरक्षित; जाणून घ्या काय आहे NPS वात्सल्य योजना?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताामन (Nirmala Sitharaman) यांनी काही दिवसांपूर्वी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्प सादरीकरणारम्यान एनपीएस वात्सल्य योजनेची (NPS Vatsalya Scheme) घोषणा करण्यात आली होती. आता याच घोषणेची अंमलबजावणी केली जात आहे. येत्या 18 सप्टेंबर 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन ही योजना चालू करणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 सप्टेंबर रोजी पोर्टल लॉन्च केले जाणार आहे. यासह या योजनेसंदर्भातील संपूर्ण माहितीही यावेळी सादर केली जाईल.

 

एनपीएस वात्सल्य योजना काय आहे?

एनपीएस वात्सल्य योजनेअंतर्गत आई वडिलांना आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्याची संधी मिळणार आहे. पालक आपल्या मुलांसाठी या योजनेच्या खात्यात बचत करून आपल्या मुलांसाठी भविष्यात मोठा आर्थिक निधी तयार करू शकणार आहेत. या योजनेत फ्लेक्झिबल कंट्रीब्यूशन (Flexible Contributions) आणि गुंतवणुकीची (Investment Option) संधी पालकांना दिली जाणार आहे.

 

मुलांचे आर्थिक भवितव्य होणार सुरक्षित

एनपीएस वात्सल्य योजना ही मुलांचे भविष्य लक्षात घेऊनच तयार करण्यात आली आहे. ही योजना म्हणजे भारतीय पेन्शन पद्धतीत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. एनपीएस वात्सल्य ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाअंतर्गत (PFRDA) चालली जाणार आहे. दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि सर्वांना आर्थिक सुरक्षितता मिळावी म्हणूनही ही योजना लागू करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

एनपीएस वात्सल्य योजनेची सुरुवात दिल्लीतून केली जाईल. मात्र या योजनेच्या लोकार्पणासाठी देशभरात साधारण 75 ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग तसेच अन्य माध्यमातून या कार्यक्रमासाठी देशभरातील लोक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमस्थळी योजनेच्या अल्पवयीन सबस्क्रायबर्सना पीआरएएन मेंबरशिप दिली जाणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -