सोने दिवसागणिक नवनवीन रेकॉर्ड ब्रेक करत आहे. आताही सोन्याने मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहे. पण याचा अर्थ तुम्ही सोन्यातच गुंतवणूक करू शकत नाही असा होत नाही. UPI मधील दादा कंपनी PhonePe ने अल्प बचत प्लॅटफॉर्म Jar सोबत एक नवीन योजना बाजारात आणली आहे. कंपनीच्या या योजनेत गुंतवणूकदारांना रोज बचत करता येईल.
ग्राहकाला रोज 24 कॅरेट सोन्यात ऑनलाईन गुंतवणूक करता येईल. या नवीन योजनेत ग्राहक प्रत्येक दिवशी कमीत कमी 10 रुपये आणि कमाल 5,000 रुपये गुंतवणूक करू शकणार आहे. त्यामुळे कमी रक्कमेत एक मोठी गुंतवणूक त्याला करता येईल. थेट 24 कॅरेट सोन्यात त्याला गुंतवणूक करता येईल. बचतीची सवय त्याच्या अंगवळणी पडेल.
Daily Savings’ हे उत्पादन Jar च्या Gold Tech सॉल्यूशनच्या मदतीने ऑपरेट करता येईल. त्यामुळे गुंतवणूकदार अवघ्या 45 सेकंदात डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करु शकतील. गेल्या काही दिवसांपासून डिजिटल गोल्डची मागणी वाढल्याचे, PhonePe च्या इन-ॲप कॅटेगिरी प्रमुख निहारिका सैगल यांचे मत आहे. त्यामुळे फोनपेने छोट्या गुंतवणूकदारांना डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करता यावी, यासाठी बचतीचा हा प्रभावी मंत्र दिला आहे. त्याआधारे अल्प बचत करून मोठी गुंतवणूक करता येईल.
सोन्यातील गुंतवणूक वाढली
PhonePe च्या दाव्यानुसार, आजकाल स्वस्त आणि सुरक्षितरित्या डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रचलन वाढले आहे. त्यामुळे कंपनीने Jar च्या सोबतीने एक नवीन पाऊल टाकले आहे. Jar ची Gold Tech सुविधेच्या माध्यमातून PhonePe च्या 560 दशलक्षहून अधिक युझर्ससाठी डिजिटल गोल्डमध्ये बचत करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही गुंतवणूक सुरक्षित आणि सोपी असल्याचा कंपनीचा दावा आहे. डिजिटल गोल्डमध्ये केलेली गुंतवणूक ग्राहक गरजेनुसार, नियम आणि अटीनुसार काढू शकतो. या नवीन योजनेत ग्राहक प्रत्येक दिवशी कमीत कमी 10 रुपये आणि कमाल 5,000 रुपये गुंतवणूक करता येणार आहे.