इचलकरंजीत एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन दगडाने केलेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला.
नदीवेस परिसरात रविवारी रात्री हा प्रकार घडला. अबुनसर अमजद शेख (वय २१ रा. मुजावरपट्टी) असे जखमीचे नांव आहे. या प्रकरणी आकाश सासणे (वय ३० रा. नदीवेस) याच्यासह अन्य दोघांवर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सासणे हा अन्य एका प्रकरणात सशस्त्र हल्ल्यात जखमी आहे.
मूळचा बिहार राज्यातील भंगीया याठिकाणचा असलेला अबुनसर शेख हा नदीवेस येथील मुजावरपट्टी येथे भाड्याच्या घरात राहण्यास आहे. रविवारी रात्री तो घरासमोर शतपावली करत असताना आकाश सासणे याने त्याच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले.
पैसे देण्यास शेख याने नकार दिल्याने सासणे व त्याच्या सोबत असलेल्या अन्य दोन अनोळखी युवकांनी शेख याच्या बंद घराच्या दरवाज्यावर लाथा व दगड मारत दरवाजा तोडला. आत प्रवेश करुन अनोळखी दोघांनी शेख याचे चुलत बंधू फैय्याज व ख्वाजा इसाक शेख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सासणे याच्यासह तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.