आयुष म्हात्रे याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना आपल्या बॅटिंगने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आयुषने शार्दुल ठाकुर, अजिंक्य रहाणे या सारख्या अनुभवी खेळाडूंसोबत खेळत मुंबईसाठी शतकी-अर्धशतकी खेळी केली. आयुषची त्याच कामगिरीच्या जोरावर अंडर 19 आशिया कप स्पर्धेत टीम इंडियात निवड करण्यात आली. आयुष म्हात्रेला अंडर 19 आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध छाप सोडता आली नाही.मात्र आयुषने दुसऱ्याच सामन्यात सर्व भरपाई केली आहे. आयुषने जपानविरुद्धच्या सामन्यात स्फोटक अर्धशतक ठोकत साऱ्या क्रिकेट चाहत्यांना दखल घेण्यास भाग पाडलं आहे.
आयुषने जपानविरुद्ध झंझावाती खेळी केली. आयुषने अवघ्या 27 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. आयुषला शतक करण्याचीही संधी होती. मात्र आयुष अर्धशतकानंतर अवघ्या काही चेंडूनंतर बाद झाला. आयुषने 29 बॉलमध्ये 186.21 च्या स्ट्राईक रेटने 54 रन्स केल्या. आयुषने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 10 चेंडूत 48 धावा केल्या. आयुषने 4 षटकार आणि 6 चौकार लगावले.
कॅप्टन मोहम्मद अमानचं नाबाद शतक
दरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन मोहम्मद अमान याने शतकी खेळी केली. आयुषने चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर पुढे त्याचा फायदा इतर फलंदाजांनी घेतला. आंद्रे सिद्धार्थने 35, केपी कार्तिकेय याने 57 धावा केल्या. निखील कुमार याने 12 धावा जोडल्या. तर अखेरीस हार्दिक राज आणि मोहम्मद अमान हे दोघे नाबाद परतले. हार्दिकने 12 बॉलमध्ये नॉट आऊट 25 रन्स केल्या. तर मोहम्मद अमानने 118 चेंडूत 122 धावांची शतकी खेळी केली. त्यामुळे भारताला 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 339 धावांपर्यंत मजल मारता आली.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद अमान (कॅप्टन), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, निखिल कुमार, केपी कार्तिकेय, हरवंश सिंग (विकेटकीपर), हार्दिक राज, समर्थ नागराज, युद्धजित गुहा आणि चेतन शर्मा.
जपान प्लेइंग ईलेव्हन : कोजी हार्डग्रेव्ह आबे (कर्णधार), आदित्य फडके, निहार परमार, काझुमा काटो-स्टाफोर्ड, चार्ल्स हिन्झे, ह्यूगो केली, टिमोथी मूर, किफर यामामोटो-लेक, डॅनियल पँकहर्स्ट (विकेटकीपर), आरव तिवारी आणि मॅक्स योनेकावा लिन.