टीम इंडियाचा टी 20i कॅप्टन आणि विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीत धमाकेदार सुरुवात केली आहे. सूर्यकुमारने 3 डिसेंबरला सर्व्हिसेस विरूद्धच्या सामन्यात झंझावाती आणि विस्फोटक अर्धशतकी खेळी केली. सूर्याने हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये 46 बॉलमध्ये 152.17 च्या स्ट्राईक रेटने 70 धावांची खेळी केली. सूर्याने या खेळीदरम्यान सर्व्हिसेसच्या गोलंदाजांची धुलाई केली. तसेच सूर्याने चौफेर फटकेबाजी करत बॅटिंगचा आनंद लुटला.
सर्व्हिसेस टीमने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पृथ्वी शॉ 0, कॅप्टन श्रेयस अय्यर 20 आणि अजिंक्य रहाणे 22 धावांवर बाद झाले. त्यामुळे मुंबईची स्थितीत 3 बाद 60 अशी स्थिती झाली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांनी टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत गोलंदाजांना जेरीस आणलं. सूर्याने या दरम्यान 32 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. सूर्याने अर्धशतकानंतरही असाच तडाखा सुरु ठेवत फटकेबाजी केली. मात्र सूर्या शेवटच्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर आऊट झाला. सर्व्हिसेसचा कॅप्टन मोहित अहलावत याने सूर्याला विशाल गौर याच्या हाती आऊट केलं.
सूर्याने त्याच्या 70 धावांच्या खेळीत 7 चौकार आणि 4 षटकार लगावले. अर्थात सूर्याने फक्त 11 चेंडूत चौकार आणि षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या.
सर्व्हिसेस प्लेइंग इलेव्हन : मोहित अहलावत (कॅप्टन आणि विकेटकीपर), कुंवर पाठक, नितीन तन्वर, मोहित राठी, गौरव कोचर, विनीत धनखर, अमित शुक्ला, विकास उमेश यादव, पूनम पुनिया, विशाल गौर आणि विकास हातवाला.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, शम्स मुलाणी, सूर्यांश शेडगे, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन आणि मोहित अवस्थी.