Monday, February 3, 2025
Homeमहाराष्ट्रमुकेश अंबानींच्या जिओची मोठी घोषणा, पुन्हा लॉन्च केला स्वस्त आणि मस्त प्लान

मुकेश अंबानींच्या जिओची मोठी घोषणा, पुन्हा लॉन्च केला स्वस्त आणि मस्त प्लान

हा प्लान जिओचा स्वस्त आणि मस्त असा प्लान आहे. जिओने 189 रुपयांचा प्लान बंद केला होता. पण आता कंपनीने यू टर्न घेत हा प्लान पुन्हा लॉन्च केला आङे. जाणून घ्या या प्लानमध्ये नेमके काय बेनेफिट्स मिळणार आहेत.

 

रिलायन्स जिओचा 189 रुपयांचा प्लान हा वॅल्यू कॅटेगरीत येतो. पण या कॅटेगरीत कंपनीने आणखी एक सब कॅटेगरी बनवली आहे ज्याचे नाव अफॉर्डेबल पॅक असे आहे. या कॅटेगरीत 189 रुपयांचा रिचार्ज प्लान उपलब्ध करण्यात आला आहे.

 

जिओने जुलै महिन्यात आपल्या रिचार्ज प्लानच्या दरात मोठी वाढ केली होती. या दरवाढीपूर्वी 189 रुपयांचा प्लान हा 155 रुपयांत मिळत होता. आता हा प्लान 189 रुपयांत मिळत आहे.

 

असा आहे 189 रुपयांचा प्लान

 

रिलायन्स जिओच्या 189 रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सला एकूण 2GB हाय स्पीड इंटरनेट डेटा मिळतो. यासोबतच देशातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि 300 एसएमएसची सुविधा मिळते. व्हॅलिडिटीचं बोलायचं झालं तर या प्लानमध्ये युजर्सला एकूण 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

 

एक्स्ट्रा बेनेफिट्सबाबत बोलायचं झालं तर जिओच्या या प्लानमध्ये युजर्सला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड यांचा अॅक्सेस फ्री मिळतो. तसेच इंटरनेट डेटा संपल्यावर तुम्हाला मिळणाऱ्या इंटरनेटचा स्पीड कमी होऊन 64kbps इतका होईल.

 

जिओचा 199 रुपयांचा प्लान

 

189 रुपयांचा प्लान हा 28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला सर्वात स्वस्त प्लान आहे. जर तुम्हाला जास्त डेटा आवश्यक असेल तर तुम्ही जिओचा 199 रुपयांचा प्लान फायदेशीर ठरू शकतो. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB हाय स्पीड डेटा, फ्री कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळतो. 199 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला 18 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -