Tuesday, February 4, 2025
Homeमहाराष्ट्रअत्यंसंस्कारावरुन दोघांचे भावांचे भांडण, मोठ्या भावाने मागितले वडीलांचे अर्धे शरीर..

अत्यंसंस्कारावरुन दोघांचे भावांचे भांडण, मोठ्या भावाने मागितले वडीलांचे अर्धे शरीर..

आई-वडीलांची म्हातारपणाची काठी असतात. आपल्या पश्चात आपल्या मुलांनी एकत्र गुण्यागोविंदाने राहावे, एकमेकांना मदत करावी अशी प्रत्येक आई-वडीलांची इच्छा असते. परंतू मध्य प्रदेशातील टीकमगढ येथे विचित्र प्रकार घडला आहे. वडिलांच्या अंत्यसंस्कारावरुन दोघा भावांमध्ये मोठे भांडण झाले आहे. त्यानंतर मोठ्या भावाने वडीलांचे अर्धे शरीर अंत्य संस्कारासाठी मागितल्याने खळबळ उडाली. त्यामुळे अखेर पोलिसांना येऊन हस्तक्षेप करावा लागला आहे.

 

८४ वर्षांच्या ध्यानी सिंह घोष हे अनेक वर्षे आजारी होते. प्रदीर्घ आजाराने त्यांचे रविवारी निधन झाले. ते त्यांचा लहान मुलगा देशराज याच्या सोबत रहात होते. मोठा मुलगा किशन याला जेव्हा कळले की वडिलांचे निधन झाले आहे तेव्हा तो गावाला पोहचला. गावी पोहचताच किशन याने वडिलांना अंत्यसंस्कार आपणच करणार असल्याचे सांगितले. त्यातून दोघांमध्ये मोठे भांडण झाले.

 

पोलिसांना पाचारण

गावातील लोकांनी दोन्ही भावातील भांडण वाढताना पाहिले तेव्हा पोलिसांना कळविले.त्यानंतर जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहचले तर मोठा भाऊ किशन हा नशेत होता. त्याने मृतदेहाचे दोन तुकडे करण्याची मागणी केली होती.त्यामुळे दोघांना वडिलांना अग्नि देता येईल असे त्याचे म्हणणे होते.

 

पोलिसांनी या किशन याला समजविण्याचे प्रयत्न केले. खुप प्रयत्नानंतर अखेर किशन याला शांत करण्यात पोलिसांना यश आले. तो शांत होऊन तेथून निघून गेला.त्यानंतर लहान मुलगा देशराज याने वडिलांचा अंत्यसंस्काराचा विधी पूर्ण केला. ही घटना पंचक्रोशीत चर्चिली जात आहे. वडिलांना अशा प्रकारे दोन हिश्शात कसे बरे वाटायचे असा प्रश्न पोलिसांना पडला. अखेर पोलिसांनी आपल्या खाक्या दाखविल्याने मोठा भाऊ निघून गेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -