Wednesday, March 12, 2025
HomeBlogमोबाइलचे व्यसन वाईट! स्मार्टफोन वापरण्यापासून रोखल्याने मुलाचा पालकांवर लोखंडी रॉडने हल्ला; आईचा...

मोबाइलचे व्यसन वाईट! स्मार्टफोन वापरण्यापासून रोखल्याने मुलाचा पालकांवर लोखंडी रॉडने हल्ला; आईचा मृत्यू

स्मार्टफोन ही सध्या काळाची गरज बनली आहे. पण लहान मुलांसाठी स्मार्टफोन अतिवापर धोकादायक ठरू शकतो. यामुळेच पालक अनेकदा त्यांच्या मुलांना स्मार्टफोनपासून दूर राहण्याचा सल्ला देताना दिसतात.

 

मात्र मध्यप्रदेशाच्या बालाघाट येथे आपल्या मुलाला हे सांगणे एका आईच्या जीवावर बेतले आहे.

 

मध्यप्रदेशमध्ये मोबाईल वापरण्यावरून मुलाने स्वत:च्या आई-वडीलांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात मुलाच्या आईचा मृत्यू झाला असून सध्या त्याचा वडीलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ५ मार्च रोजी घडली.

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार सत्यम नावाच्या मुलाला त्याच्या वडिलांनी मोबाइल फोन पाहणे थांबवण्यास सांगितल्याचा राग आला. त्याने लोखंडी रॉड घेतला आणि वडिलांच्या डोक्यात वार केला. यादरम्यान मुलाची आई वाद थांबवण्यासाठी मध्ये आल्यानंतर त्याने तिच्यावरही वार केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

मुलानेच पोलिसांना फोन करून या घटनेबद्दल माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मुलाच्या वडिलांची प्रकृतीदेखील नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना महाराष्ट्रातील गोंदिया येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

शेजाऱ्यांनी सांगितले की सत्यम कोणाशीही बोलत नसे. तो नीटच्या कोचिंगसाठी कोटाला गेला होता पण चार महिन्यांत परतला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -