सॅमसंगने जानेवारीमध्ये गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट दरम्यान नवीनतम Galaxy S25 सीरिज लॉन्च केलीय. सॅमसंगचा हा आतापर्यंतचा सर्वात चपटा स्मार्टफोन आहे. Galaxy S25 Edge जो लवकरच लॉन्च होणार आहे
सॅमसंगने आधी डिव्हाइसच्या लवकरच लॉन्च करण्याबद्दल माहिती दिली होती.
फोनची किंमत आणि त्यातील काही खास फीचर्स लीकमध्ये समोर आली आहेत. अँड्रॉइड हेडलाइन्सच्या अहवालानुसार गॅलेक्सी एस25 एज फोन टायटॅनियम आइसब्लू, टायटॅनियम जेटब्लॅक आणि टायटॅनियम सिल्व्हर कलर व्हेरियंटमध्ये मिळेल. S25 Edge मध्ये टायटॅनियम बिल्ड असेल.
भारतात किंमत काय असू शकते?
लेटेस्ट लीक्सने दिलेली वृत्तानुसार, गॅलेक्सी S25 एजची संभाव्य किंमत सांगितलीय. S25 Edge च्या बेस व्हेरिएंटची युरोपमध्ये किंमत रु. 1200 ते रु. 1300 युरो दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. यानुसार भारतात या फोनची किंमत रु. 1,14,000 ते रु. 1,23,000 च्या दरम्यान असेल. किमतीनुसार , Galaxy S25 Edge हे स्टँडर्ड Galaxy S25 Ultra च्या किमतीच्या जवळपास असेल.
सॅमसंग गॅलेक्सी S25 सीरीजची किंमत बेस 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 80,999 रुपयांपासून सुरू होते. Galaxy S25+ (256GB) ची किंमत 99,999 रुपये आहे, तर Galaxy S25 Ultra ची किंमत 1,29,999 रुपये आहे. Galaxy S24 मालिकेतील प्लस आणि अल्ट्रा या दोन्हींच्या किमती सारख्याच आहेत, तर स्टॅटर्ड S25 मॉडेलची किमत आधीच्या मॉडेलच्या तुलनेत रु. 1,000 ने वाढ करण्यात आलीय.
भारतात कधी लाँन्च होईल?
Samsung अद्याप Galaxy S25 Edge ची अधिकृत लॉन्च तारीख जाहीर झालेली नाहीये. लीक्सने दिलेल्या वृत्तानुसार स्मार्टफोन जागतिक स्तरावर 16 एप्रिल रोजी लॉन्च केला जाऊ शकतो. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. Galaxy S25 Edge फोन Snapdragon 8 Elite chipset ने सुसज्ज असेल,हे Galaxy S25 च्या सीरिजमधील सर्व स्मार्टफोन्समध्ये देखील आहे.
या स्मार्टफोनमध्ये 4,000mAh बॅटरी देण्यात आलीय. तर ड्युअल-कॅमेरा सेटअप असणार आहे. यात 200-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्स आणि 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सरचा यात समाविष्ट करण्यात आलाय. स्मार्टफोनच्या फ्रंटला 12-मेगापिक्सेल कॅमेरा असण्याची शक्यता आहे.