Tuesday, August 26, 2025
Homeमहाराष्ट्ररेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी ; सरकारने घेतला 'हा' निर्णय?

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी ; सरकारने घेतला ‘हा’ निर्णय?

रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्डधारकांना केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ दिली होती. मात्र आता ही मुदत आणखी १ महिना वाढवून देण्यात आली आहे.

 

सरकारने आता ई-केवायसी करण्यासाठी ३१ एप्रिल २०२५ मुदत दिली आहे.

 

याबाबत विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौथ्यांदा मुदतवाढ करण्यात येत आहे. ही शेवटची संधी असणार आहे. यानंतर रेशन कार्ड केवायसी करण्याची मुदत वाढवण्यात येणार नाही. त्यामुळे तुम्ही ३० एप्रिल २०२५ पर्यंत केवायसी करु शकतात.यानंतर कोणालाही केवायसी करता येणार नाही. यामुळे त्या व्यक्तीचे रेशन कार्ड रद्द होणार आहे. यामुळे त्यांना मोफत धान्य मिळणार नाही. सरकारने रेशन वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी ही केवायसी करणे गरजेचे आहे.

 

रेशन कार्ड केवायसी कसं करायचं?

केवायसी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करु शकतात. तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात जायचे आहे तिथे रेशन कार्डची प्रत आणि आधार कार्ड दाखवायचे आहेत. तिथे जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने व्हेरिफिकेशन करायचे आहे.

 

तुम्ही ऑनलाइन पद्धतीनेही केवायसी करु शकतात.

तुम्हाला फक्त मेरा KYC आणि Aadhaar Face RD हा अॅप डाउनलोड करायचा आहे.

यानंतर तुम्हाला लोकेशन निवडायचे आहेत. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर महाराष्ट्र निवडायचे आहे.

यानंतर आधार नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुमचे फेस व्हेरिफिकेशन होईल. आणि तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -