Tuesday, August 26, 2025
Homeमहाराष्ट्रपोलिसाकडून जखमी मुलीची दवाखान्याच छेडछाड

पोलिसाकडून जखमी मुलीची दवाखान्याच छेडछाड

जखमी झालेल्या मुलीचा जबाब नोंदविण्यास गेलेल्या पोलिसाने मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी चेतन दिलीप घाटगे (बक्कल क्रमांक ४२०) या पोलिसावर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पीडित मुलीचा जबाब घेण्यासाठी तो बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास रुग्णालयात गेला होता. त्यावेळी हा प्रकार घडला. याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.

पीडित मुलीने हाताला कापून घेतल्याने तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिचा जबाब नोंदविण्यासाठी संशयित चेतन घाटगे बुधवारी रात्री रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात गेला होता. यावेळी त्याने स्वतःचा मोबाईल क्रमांक या मुलीला दिला. ‘तू माझी मैत्रीण आहेस, भिऊ नको. काही अडचण असल्यास मला फोन कर’ असे सांगत तिला ठिकठिकाणी छेडछाड केल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -