Tuesday, August 26, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीतील रस्त्यांची दयनीय अवस्था, भाजप पदाधिकाऱ्यांकडून तक्रार

इचलकरंजीतील रस्त्यांची दयनीय अवस्था, भाजप पदाधिकाऱ्यांकडून तक्रार

नगरोत्थान योजनेअंतर्गत इचलकरंजी महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यांची(Road) कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे अत्यंत संथगतीने आणि निकृष्ट दर्जाची होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

 

विशेषतः सांगली रोड(Road) ते वडगाव बाजार समिती परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि बाजारपेठेतील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीबाबत भाजप शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे.

 

 

अपघातांचा धोका वाढला

या मार्गावर अपूर्ण राहिलेल्या कामामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. याआधी नदीवेस नाका येथे रस्त्याच्या कामामुळे अपघात होऊन तिघांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे सांगली नाका ते यड्राव फाटा परिसरातही अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

 

माहिती फलकांचा अभाव

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांविषयी कोणतीही अधिकृत माहिती देणारे फलक कुठेही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना या कामांबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळत नसल्याची तक्रार आहे.

 

शासनाच्या लक्ष वेधण्याचा प्रयत्न

दाभोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना लेखी तक्रार दिली असून, या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिलिपी पाठवली आहे.

 

आंदोलनाचा इशारा

जर त्वरित योग्य ती कारवाई न झाल्यास, वडगाव बाजार समिती परिसरातील नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांत तीव्र संतापाची भावना आहे, आणि यावर लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -