जम्मू-कश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षादलांनी मोठी कारवाई केली आहे. काश्मीर खोऱ्यातून १५०० हून अधिक व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तींमध्ये ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांचा समावेश आहे.
हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरसह (Pahalgam Terrorist Attack) सीमाभाग पंजाबमध्येही सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. घटनास्थळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवार (२३ एप्रिल) रोजी भेट दिली. त्यांनी सुरक्षा यंत्रणांकडून घटनेची माहिती घेतली आणि दहशतवाद्यांनी कोणत्या मार्गाने प्रवेश केला याचा आढावा घेतला. हे ठिकाण श्रीनगरपासून सुमारे ११० किमी अंतरावर आहे आणि घनदाट देवदारांच्या जंगलांनी वेढलेले आहे.
राजनाथ सिंह यांचा लडाख दौरा रद्द
रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी हल्ल्यानंतर लडाखमधील आपला नियोजित दोन दिवसांचा दौरा रद्द केला आहे. ते २५ व २६ एप्रिल रोजी लडाखच्या दौर्यावर जाणार होते. त्याऐवजी त्यांनी जम्मू-कश्मीरमधील सुरक्षास्थितीबाबत सविस्तर आढावा घेतला.
जगभरातून भारताला पाठिंबा (Pahalgam Terrorist Attack)
या दहशतवादी हल्ल्याची अमेरिका, रशिया आणि इस्रायलसह अनेक देशांच्या नेत्यांनी तीव्र शब्दांत निंदा केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताच्या एकजुटीला पाठिंबा दर्शवला आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
पुतिन यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांना (Pahalgam Terrorist Attack) पाठवलेल्या संदेशात आपल्या संवेदना व्यक्त केल्या आणि या क्रूर घटनेतील दोषींना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी केली.