Saturday, January 17, 2026
Homeमहाराष्ट्रसांगली : ट्रॅक्टर अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू

सांगली : ट्रॅक्टर अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू

ट्रकमधून नवीन ट्रॅक्टर खाली उतरवताना तो अंगावर पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. सचिन अण्णासाहेब पाचोरे (वय 50, मूळ रा. नांद्रे, सध्या रा. मौजे डिग्रज, ता. मिरज) असे मृताचे नाव आहे.

 

याप्रकरणी संदीप अण्णासाहेब पाचोरे यांनी, शंकर गणपती माळी (वय 55, रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ), सुरेश संभाजी कदम (रा. लक्ष्मी मंदिरजवळ कुपवाड फाटा, सांगली) आणि नितीन ऊर्फ हरी बापू हत्तीकर (रा. माधवनगर, सांगली) यांच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

याबाबत माहिती अशी, सचिन पाचोरे हे एका शोरूममध्ये कामास होते. या शोरूमसाठी गुरुवार, दि. 8 रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास नवीन ट्रॅक्टर आले होते. ते ट्रकमधून उतरविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी सचिन पाचोरे हे ट्रकखाली थांबले होते. शंकर माळी हा ट्रकमधून ट्रॅक्टर खाली उतरवत होता. ट्रॅक्टर ट्रकच्या पाट्यावरून वळवून रॅम्पवरून खाली आणत असताना त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टर थेट सचिन यांच्या अंगावर पडला. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने सचिन यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शंकर माळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शोरूमचे व्यवस्थापक सुरेश कदम यांनी सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नाही, तसेच सुपरवायझर नितीन ऊर्फ बापू हत्तीकर यांनी सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेण्याचे साहित्य पुरविले नाही, यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -