Monday, December 23, 2024
Homeराशी-भविष्यपेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील किमती!

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील किमती!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आयओसीएलने (IOCL) रविवारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. राष्ट्रीय बाजारात आज म्हणजे 19 डिसेंबर रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिवाळीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. 4 डिसेंबरपासन पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. नवीन दरानुसार, आज देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 86.67 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 109.98 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी सरकार नवीन योजना तयार करत आहे. कच्च्या तेलाच्या किमती खाली आणण्यासाठी इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या समन्वयाने भारत आपल्या धोरणात्मक तेल साठ्यातून तेल काढण्याच्या योजनेवर काम करत आहे.

तुम्ही तुमच्या शहराचं पेट्रोल दर इथे पाहू शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर (check diesel petrol price daily) देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर आरएसपी आणि 9223112222 या क्रमांकावर आरएसपी लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -