Thursday, February 12, 2026
Homeमहाराष्ट्रखून का बदला खून! बापाच्या खुनाचा बदला पोराने घेतला, सांगलीत थरकाप उडवणारी...

खून का बदला खून! बापाच्या खुनाचा बदला पोराने घेतला, सांगलीत थरकाप उडवणारी घटना

खून का बदला खून. बापाच्या खूनचा बदला मुलाने घेतला. हे सर्व चित्रपटाला शोभेल असचं आहे. पण असं प्रत्यक्षात घडलं असेल तर. होय असं प्रत्यक्षात घडलं आहे. खून का बदला खून याचा थरार सांगलीकरांना अनुभवला आहे.

 

2021 साली वडीलांच्या खूनाचा बदला मुलाने खूनानेच घेतला आहे. त्यामुळे सांगली शहर हादरून गेले आहे. शिवाय घटनेमुळे सगळीकडे भितीचे वातावर पसरले आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय त्यांना खून का केला याची कबूलीही दिली आहे.

 

2021 साली महेश कांबळे यांने फिरोज शेख यांचा पैशाच्या देण्या घेण्यावरून खून केला होता. या खून प्रकरणी महेश कांबळे याला अटक ही करण्यात आली होती. मात्र दोन वर्षानंतर म्हणजेच 2023 साली महेश कांबळे हा जामीनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने शहरात भाजीचे दुकान टाकले. त्यात तो कोथिंबीर विक्रीचा व्यवसाय करत होता. महेश कांबळे बाहेर आला आहे याची कल्पना फिरोज शेख याचा मुलगा मुजाहिद याला समजली होती. तो संधीच्या शोधात होता.

 

मुजाहिद शेखच्या मनात सुडाची भावना होती. वडीलांचा खून केलेला खूनी बाहेर फिरतोय हे त्याला पचत नव्हते. त्यामुळे त्याच्या मनात प्रचंड राग होता. शिवाय महेश याचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे ही मुजाहिद याला समजले होते. त्यामुळे तो आणखीनच चिडला होता. खुनाचा बदला घेण्यासाठी साथीदाराच्या मदतीने तो संधी शोधत होता. गुरुवारी सकाळी कोथिंबीर खरेदी केल्यानंतर महेश गाडीवरून शंभरफुटीमार्गे निघाला होता.

 

त्यावेळी तो लघुशंकेस थांबला होता. हिच संधी साधत मुजाहिद आणि त्याच्या साथीदाराने महेश कांबळेवर हल्ला केला. यात महेश गंभीर जखमी झाला. त्याच अवस्थेत त्याचा मृत्यू ही झाला. पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह शंभरफुटी रस्त्यावर दिसून आला. याप्रकरणी पोलिसांनी मुजाहिद शेख याला व याच्या साथीदाराला अटक केली आहे. त्याने बापाच्या खूनाचा बदला घेतला असल्याचे मान्य केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -