Tuesday, September 16, 2025
Homeकोल्हापूरदारुड्या वाढप्याचा तलवार, सत्तूरने केटरिंगवाल्यावर हल्ला

दारुड्या वाढप्याचा तलवार, सत्तूरने केटरिंगवाल्यावर हल्ला

दारू पिऊन आलेल्या वाढप्याला हाकलून दिल्यानंतर वाढप्याने मित्रांसह केटरिंगवाल्यावरच तलवार, सत्तूरने खुनी हल्ला चढविला. मार्केट यार्ड येथील रामकृष्ण हॉलमध्ये 8 जूनला मध्यरात्री 1 च्या सुमारास ही घटना घडली.

 

शाहूपुरी पोलिसांत नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

 

हल्ल्यात विवेक विश्वनाथ शिंदे (वय 44, व्यवसाय केटरिंग), राहुल धनपाल शेंडे, अमोल मनोहर माणकापुरे (वय 41, दोघे रा. पाचगाव) जखमी झाले. शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाढपी सचिन पाटील, विनायक शिंदे, शुभम सिद्धप्पा सिंधनाळकर व इतर सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

 

शिंदे यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. 8 जूनला कार्यक्रम मिळाला. वाढपींची आवश्यकता होती. सिंधनाळकर याला वाढपी कामासाठी माणसे आणण्यास सांगितले. त्याने सचिन पाटील, विनायक शिंदे याच्यासह इतरांना आणले. कार्यक्रमावेळीच विनायक शिंदे दारू पिऊ लागला. कार्यक्रमात व्यत्यय येऊन नाव खराब होईल म्हणून विवेक शिंदे यांनी त्याला हाकलून दिले.

 

हॉलमधील कार्यक्रम संपून स्वच्छता सुरू होती. मध्यरात्री एक वाजता पाटील, सिंधनाळकर, शिंदे यांच्यासह त्यांचे सहा मित्र हॉलमध्ये तलवार, सत्तूर, हॉकी स्टीक घेऊन आले. त्यांनी विवेक शिंदे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांना सोडविण्यासाठी इतर कामगार आले. त्यांच्यावरही मारेकर्‍यांनी हल्ला चढविला. अखेर केटरिंगचे सर्व कामगार एकत्र आल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर विवेक शिंदे यांनी शाहूपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -