Wednesday, July 23, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाला मोठा झटका, 2 टेस्टमधून हा स्टार खेळाडू बाहेर, गंभीरने दिले...

टीम इंडियाला मोठा झटका, 2 टेस्टमधून हा स्टार खेळाडू बाहेर, गंभीरने दिले मोठे अपडेट्स

भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात पराभवाने केली आहे. लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 5 शतके झळकावूनही, टीम इंडियाला 5 विकेट्सनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. 2025-2027 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) कोणत्याही संघाचा हा पहिलाच पराभव आहे. 17 जूनपासून WTC 2025-27 सुरू झाले असून भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात पराभवाने केली आहे. लीड्स कसोटीत भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. यामुळे, भारतीय संघ 371 धावांचे लक्ष् डिफेंड करू शकला नाही. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पाच विकेट घेणारा भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुसऱ्या डावात मात्र एकही विकेट घेऊ शकला नाही.

 

याच दरम्यान भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल मोठे विधान करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. दोन कसोटी सामन्यांमध्ये बुमराह संघाबाहेर असल्याबद्दल गंभीरने मोठा खुलासा केला आहे.

 

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेत फक्त तीन कसोटी सामने खेळेल या गोष्टीची लीड्स कसोटी सामन्यातील पराभवानंतर, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पुष्टी केली. मात्रहा निर्णय मालिका सुरू होण्यापूर्वी घेण्यात आला होता आणि स्कोअरलाइनमुळे त्यात कोणताही बदल होणार नाही असेही त्याने नमूद केलं. “बुमराह कोणते दोन सामने खेळेल हे अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु तो या मालिकेत एकूण तीन सामने खेळेल. आम्हाला त्याच्यावर जास्त दबाव आणायचा नाही ” असं गंभीरने सांगितलं.

 

याआधी प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये कर्णधार शुभमन गिलनेही बुमराहबद्दल असेच काहीसे सांगितले होते. तो म्हणाला की प्रत्येक सामन्यानुसार हे ठरवले जाते. जेव्हा आपण दीर्घ विश्रांतीनंतर पुढील सामन्याच्या जवळ पोहोचू तेव्हा पुढे काय घडतं ते पाहू. दुसरी कसोटी 2 जुलैपासून एजबॅस्टन येथे सुरू होईल. मात्र या टेस्ट मॅचमध्ये बुमराह खेळेल की नाही, याचा निर्णय तेथील कंडीशन पाहून टीम मॅनेजमेंट घेईल.

 

पहिल्या डावात बुमराहने काढल्या 5 विकेट्स

 

पहिल्या कसोटी सामन्यात, बुमराहने इंग्लंडच्या पहिल्या डावात पाच विकेट्स टिपल्या. मात्र त्याच्या बॉलिंगवर काही कॅचेस सोडले नसते तर त्याच्या विकेट्सची संख्या जास्त असती, परंतु दुसऱ्या डावात बुमराहने संघाला पूर्णपणे निराश केले आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. यामुळेच भारताला पहिल्या कसोटीत मानहानीकारक पराभव पत्करावा लागला.

 

या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 471 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. मात्र त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त 364 धावा करू शकला. त्यामुळे विजयासाठी इंग्लंडच्या संघासमोर 371 धावांचे आव्हान होते, जे त्यांनी 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -