पालकमंत्र्यांना भेटू या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या एका व्यक्तीला डी वाय एस पी अधिकाऱ्यांनी लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. सिनेमात ज्याप्रकारे पोलीस गुंडांना मारतात त्याचप्रमाणे डी वाय एस पी अनंत कुलकर्णींनी सुद्धा आधीच पकडलेल्या आंदोलकांना लाथ मारली.
या व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मीडियात पोलिसांच्या वर्तनावर टीका होतेय. गोपाळ चौधरी नावाचे व्यक्ती मागच्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते. तक्रारीनुसार त्यांच्या पत्नीने पळून जाऊन परपुरुषासोबत लग्न केलंय.
मात्र तक्रार देऊन सुद्धा पोलिसांनी पैसे खाल्ल्यामुळे कारवाई न झाल्याचा आरोप त्यांचा आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंत्री पंकजा मुंडे येत असल्याने आपल्याला त्यांना भेटू द्या अन्यथा आत्मदहन करू असा इशारा आंदोलकांनी दिला होता. तर दुसरीकडे आंदोलकांनीच महिला पोलिसांच्या अंगावरही रॉकेट टाकण्याचा प्रयत्न केल्याने आम्हाला बळाचा वापर करावा लागला असं लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलंय. नेमकं घडलं काय?