Sunday, August 24, 2025
Homeक्रीडाआशिया कपमध्ये खेळणार की नाही? जसप्रीत बुमराहने सोडले मौन, BCCI ला निरोप...

आशिया कपमध्ये खेळणार की नाही? जसप्रीत बुमराहने सोडले मौन, BCCI ला निरोप काय?

आशिया कप 2025 साठी भारतीय क्रिकेट संघाची लवकरच निवड होऊन घोषणा होईल. 19 ऑगस्ट रोजी BCCI टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराह या संघात असेल की नाही याविषयीची चर्चा सुरू आहे. तर काही वरिष्ठ खेळाडूंनी त्याच्याविरोधात मोर्चा उघडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तो आशिया कपमध्ये खेळणार की नाही याविषयी संभ्रम कायम आहे. आता जसप्रीत बुमराह यानेच मोठा खुलासा केला आहे, त्याने BCCI ला काय पाठवला निरोप?

 

आशिया कपाचे आयोजन 9 सप्टेंबरपासून युएईमध्ये करण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना हा 10 सप्टेंबर रोजी होईल. बीसीसीआयने अद्याप यासाठी संघाची घोषणा केलेली नाही. 19 ऑगस्ट रोजी निवडकर्त्यांची बैठक होईल. त्यात टीम इंडियात कोणाला स्थान द्यायचा यावर विचार होणार आहे. आशिया कपमध्ये बुमराह खेळणार की नाही, यावर खल सुरू होता. त्यावर बुमराह याने मौन सोडले आहे. आपण आशिया कपासाठी तयार असल्याचे त्याने बीसीसाआयला कळवले आहे.

 

जसप्रीत बुमराहचा काय निरोप

 

भारतीय संघ आणि चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बुमराह हा आशिया कपसाठी खेळण्याची शक्यता आहे. आपण या आशिया कपमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याचे त्याने कळवले आहे. इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या माहिती आधारे वृत्त दिले आहे. त्यानुसार, जसप्रीत बुमराहने बीसीसीआयला याविषयीची सूचना दिली आहे. आशिया कपमध्ये खेळण्यास आपण उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता निवड समिती त्यावर निर्णय घेईल.

 

सूर्यकुमार यादव पण फिट

 

टी20 चा कर्णधार सूर्यकुमार यादव याने फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली आहे. तंदुरुस्तीसाठीची चाचणी त्याने यशस्वीरित्या पूर्ण केली. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. आता बीसीसीआय, टीम इंडियात कोणत्या खेळाडूंना संधी देते यावर चर्चा सुरू आहे. शुभमन गिल याला सुद्धा संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आशिया कपमध्ये भारत अ गटात आहे. भारताचा पहिला सामना युएईसोबत असेल. त्यानंतर भारत पाकिस्तानशी भिडेल. या गटातील अखेरचा सामना ओमान या देशासोबत असेल. त्यानंतर सुपर 4 मध्ये 3 सामने खेळण्यात येतील.

 

10 सप्टेंबर : यूएई (दुबई) 14 सप्टेंबर: पाकिस्तान (दुबई) 19 सप्टेंबर: ओमान (अबू धाबी)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -