तुम्हीही पदवी पास असाल आणि MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ब सेवांसाठी संयुक्त पूर्व परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे.
या परीक्षेच्या माध्यमातून विविध विभागातील २८२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर भरती प्रक्रियेतून पोलीस उपनिरीक्षक पदांच्या एकूण ३९२ जागांचा समावेश आहे.
आता नव्याने समावेश झालेल्या ३९२ मिळून ६७४ जागा भरल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी १ ऑगस्टपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे. ‘एमपीएससी’च्या महाराष्ट्र गट – ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२५ असणार आहे.
गट – ब ची जाहिरातीत ‘पीएसआय’च्या जागा नसल्याने हजारो उमेदवार निराश झाले होते. त्या जाहिरातीत 282 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यामुळे हजारो उमेदवार नाराज झाले होते. आता या भरतीत गट ब च्या 393 जागाचा समावेश केल्याने हजारो उमेदवारांना मुख्य परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
शैक्षणिक अर्हता?
विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता असणे गरजेची असेल.
यावर्षी पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असणार आहेत. या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. इंटर्नशिप किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असणाऱ्या पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.