Saturday, August 23, 2025
Homeइचलकरंजीपंचगगने ओलांडली इशारा पातळी

पंचगगने ओलांडली इशारा पातळी

पावसाने जरी उसंत दिली असली तरी धरणातून सुरु असलेल्या विसर्गामुळे येथील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी पसरुन पूरग्रस्त भागातील नागरी वस्तीत शिरु लागल्याने महानगरपालिकेच्या वतीने ३० कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. या सर्वच कुटुंबांनी नातेवाईकांकडे व अन्यत्र स्थानांतर केले आहे. तर महानगरपालिकेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी ४२ सुरक्षित छावण्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाणी पातळी ६८.४ फुटावर पोहोचली होती. इचलकरंजी- पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून नागरी भागात शिरलेले पुराचे पाणी.

 

पुरग्रस्त भागात पाणी शिरले; ३० कुटुंबांचे स्थलांतर पंचगंगा नदीची इशारा पातळी ६८ फुटावर तर धोका पातळी ७१ फुटावर शुक्रवारपासून लक्ष्मी दडू व कटके गल्ली परिसरातील ३० कुटुंबांतील ९६ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचबरोबर ९ जनावरांचेही छावणीत तर ६४ जनावरांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले आहे. पुरग्रस्त नागरिक व जनावरांसाठी आवश्यक स्पा उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी दिली आहे. मागील चार दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने व धरणातून ओलांडली इशारा पातळी

 

पाणी विसर्ग सुरु केल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत चालली होती. शुक्रवारी सकाळी पाणी पातळी इशारा पातळी पार करुन गेली. तर पाणी पसरुन ते नागरी वस्तीत शिरल्याने महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कुटुंबांचे स्थलांतर केले जात आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास आयुक्त पल्लवी पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह मळेभागात पाहणी करुन नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सुचना केल्या होत्या. शहर परिसरासह धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि धरणातून सुरु पाण्याचा विसर्ग यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन ती इशारा पातळीपर्यंत पोहचली आहे. यशोदा पुलाची बांधणी आणि महानगपालिकेच्या वतीने यशोदा पुल परिसरात स्वच्छता मोहिम राबवल्याने पाणीही वेगाने पुढे सरकत आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणाही सब आहे. महानगरपालिकेच्या वतीने ४२ छावण्या सक्रीय ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर स्थलांतरी नागरिकांसाठी जेवण, मुलांसाठी दुध, बिस्किटे व आवश्यक साहित्य तसेच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे. महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी घाबरुन जावू नये. प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करुन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -