तीन लाख घरगुती ग्राहकांना दिवसा स्वस्त वीज दर
महावितरणने राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी मीटरद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील ३ लाख ११ हजार ५२२ ग्राहकांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ३५ लाख ८ हजार रुपयांची सवलत दिली आहे.
हे मीटर ग्राहकांना मोफत दिले जात आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरासाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे, जी १ जुलैपासून लागू झाली आहे.