भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल सध्या क्रिकेट(cricket) चाहत्यांसाठी चिंता निर्माण करणाऱ्या स्थितीत आहे. दुलीप ट्रॉफी 2025 28 ऑगस्टपासून सुरू होणार असून, त्याआधीच शुबमन आजारी असल्याचे वृत्त समोर आले आहे. या स्पर्धेत त्याला नॉर्थ झोनचे नेतृत्व देण्यात आले आहे, मात्र त्याची तब्येत कशी आहे आणि तो खेळू शकेल की नाही, याबाबत अस्पष्टता आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमन सध्या चंडीगढमध्ये आराम करत आहेत. भारतीय संघाचा फिजिओ आणि टीम मॅनेजमेंट यांच्याशी चर्चा करून त्याला दुलीप ट्रॉफीच्या सुरुवातीच्या टप्प्यात खेळू नये असा सल्ला देण्यात आला आहे. ही स्पर्धा 28 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान बंगळुरुतील सेंट्रल ऑफ एक्सीलेंस मध्ये होणार आहे.
शुबमन गिलला टी-20 आय संघात उपकर्णधारपदासह निवड करण्यात आले आहे. आशिया कप 2025 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणार असून, या स्पर्धेत खेळण्यासाठी त्याला फिट राहणे आवश्यक आहे. त्यामुळे दुलीप ट्रॉफीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तो खेळला नाही तरी आशिया कपसाठी त्याची तयारी सुरू राहणार आहे.
शुबमन गिल दुलीप ट्रॉफीत नसल्यास नॉर्थ झोनच्या उपकर्णधार अंकित कुमार कॅप्टन्सीची जबाबदारी सांभाळू शकतो. त्यामुळे टीमच्या व्यवस्थापनाला नेतृत्व बदलाच्या पर्यायांबाबत तयारी करावी लागणार आहे.क्रिकेट चाहत्यांसाठी ही परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे, कारण दुलीप ट्रॉफी ही देशांतर्गत क्रिकेटमधील(cricket) महत्वाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि त्याचा प्रभाव आशिया कप तयारीवरही पडू शकतो.




