Wednesday, November 12, 2025
Homeब्रेकिंगगणेशोत्सवात मद्य विक्री बंदीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

गणेशोत्सवात मद्य विक्री बंदीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

गणेशोत्सव काळात शहरातील मध्य भागातील मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा आदेशाला मंगळवारी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थिगितीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश दिले.

 

त्यानुसार मध्य भागातील मद्य विक्री दुकाने गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट), गौरी आगमन (३१ ऑगस्ट), गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि विसर्जन सोहळ्याच्या (६ सप्टेंबर) दिवशी बंद राहणार आहेत.

 

गणेशोत्सव काळात खडक, विश्रामबाग, फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला होता. या निर्णयाला शहरातील बार ॲण्ड रेस्टॉरंट चालक संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. या याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

 

गणेशोत्सवात मध्य भागात मोठ्या संख्येने भाविक येतात. परगाव, तसेच परराज्यातून येणाऱ्यांची संख्या मोठी असते. याकाळात कोणताही गैरप्रकार, वाद, तसेच भांडणाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहराच्या मध्य भागातील मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता.

 

या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. त्यानुसार गेल्या वर्षी उत्सवाच्या काळात संपूर्ण दहा दिवस खडक, विश्रामबाग, फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्री दुकाने (बार अँड रेस्टॉरंट, वाइन शॉप) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. यावर्षी मध्य भागातील मद्य विक्री दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

 

या निर्णयास बार ॲड रेस्टॉरंट संघटना आणि मद्य विक्रेत्यांनी विरोध दर्शविला होता. मद्य विक्रेत्यांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. त्यानंतर उच्च न्यायालयाने मध्य भागातील मद्य विक्रीचे दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा आदेशाला स्थगिती दिली. त्यानुसार संपूर्ण दहा दिवस मद्य विक्री बंदीचा आदेश फेटाळण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश काढला.

 

काय आहे सुधारित आदेश –

 

गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट) आणि अनंतचतुर्दशीच्या दिवशी (६ सप्टेंबर) या दोन्ही दिवशी संपूर्ण जिल्ह्यातील मद्य विक्री दुकाने बंद (ड्राय डे) ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सात सप्टेंबरला विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पुणे महापालिका क्षेत्रातील मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्य विक्री दुकाने बंद ठेवावी. याशिवाय ज्या भागात पाचव्या आणि सातव्या दिवशी विसर्जन पार पडते, त्या भागातील मिरवणुकीच्या मार्गावरील दुकाने मिरवणुकीदरम्यान बंद असतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुधारित आदेशात नमूद आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -