Thursday, November 13, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी येथील ‘बीके’ गँगवर एक वर्ष हद्दपारीची कारवाई

इचलकरंजी येथील ‘बीके’ गँगवर एक वर्ष हद्दपारीची कारवाई

इचलकरंजी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या ‘बीके’ गँगवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गँगचा म्होरक्या राजकुमार ऊर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे (वय 42) याच्यासह गँगमधील 13 जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल एका वर्षासाठी हद्दपार(Exile) करण्यात आले आहे.

 

या कारवाईत राजकुमार ऊर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे याच्यासोबत गणेश राम ऊर्फ संतोष कांबळे, पृथ्वीराज ऊर्फ भैया संतोष कांबळे, आदित्य अविनाश निंबाळकर, स्वप्निल सोमनाथ तारळेकर, समाधान साधू नेटके, अर्जुन लक्ष्मण भोसले, यश सुभाष निंबाळकर, ओंकार श्रीपती ढमणगे, सुमित बच्चन ऊर्फ राजकुमार कांबळे, प्रेम शंकर कांबळे, बालाजी ऊर्फ अविनाश अर्जुन आवळे

 

या सर्वांवर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे गावभाग पोलीस ठाण्याचे पो.नि. महेश चव्हाण यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 55 नुसार प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्याला मंजुरी देत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई अमलात आणली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -