Tuesday, September 16, 2025
Homeब्रेकिंगआजारी आईला झोप लागली अन् ५ वर्षाच्या बालिकेवर हैवानाकडून अत्‍याचार

आजारी आईला झोप लागली अन् ५ वर्षाच्या बालिकेवर हैवानाकडून अत्‍याचार

परळी वैजनाथ येथे हैवानी दुष्कर्त्याने परिसीमा गाठली असुन आज दि. 31 रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे स्थानकात थांबलेल्या एका पाच वर्षीय बालिकेला उचलून नेत तिच्यावर बलात्कार केला.

 

हा संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला असून बीडमध्ये या घटनेबाबत संताप व्यक्‍त होत आहेयाबाबत प्राप्त प्राथमिक माहिती अशी की, पंढरपूर येथील एक जोडपे आपल्या लहानग्या पाच वर्षीय मुलीला घेऊन कामाच्या शोधात परळीला रेल्वेने आले. सकाळच्या सुमारास रेल्वे परळी वैजनाथ स्थानकावर आली. या ठिकाणी हे पती-पत्नी आपल्या मुलीसह उतरले. यातील पीडित बालिकेची आई दोन-तीन दिवसापासून आजारी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरच थोडा वेळ आराम करून आपण बाहेर जाऊ असा विचार करून ती आपल्या मुलीला कुशीत घेऊन त्याच ठिकाणी झोपली. पिडित मुलीचे वडील स्थानकातच थोडेसे बाजूला गेलेले होते. दरम्यान तेवढ्या काही वेळात या मुलीच्या आईला झोप लागली व मुलगी तिच्या अवतीभवतीच चकरा मारत होती.

 

याच दरम्यान एकटी मुलगी बघून अज्ञात हैवानी वृत्तीच्या व्यक्तीने तिला त्या ठिकाणाहून नेले व गैकृत्य केले. पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार करून हा अज्ञात हैवान तिथून निघून गेला. ही मुलगी रडत तिच्या आईकडे आल्यानंतर तिच्या आईने काय झाले याचा शोध घेतला असता तिच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव बघून तिच्यावर गैरप्रकार झाल्याचे तिच्या लक्षात आले. या पीडित बालिकेला परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत गैरकृत्य झाल्याचे आढळले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -