राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी अन त्यांच्या पालकांसाठी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारच्या या नव्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे.
खरंतर पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबवली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना यशस्वीरित्या राज्यात राबवली जात असून या अंतर्गत आतापर्यंत अनेकांना लाभ मिळाला आहे.
दरम्यान आता या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा मोठा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी या नव्या निर्णयाची माहिती दिली आहे.
या नव्या निर्णयामुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनुदानाच्या रकमेत सरकारकडून 50 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत या अंतर्गत विद्यार्थ्यांना दीड लाख रुपयांचे अनुदान मिळत होते मात्र आता अनुदान 50 हजार रुपयानी वाढवण्यात आले आहे.
अर्थात विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत आता दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे. योजनेतील इतर प्रकरणातील रक्कमही याच्या समप्रमाणात वाढविण्यात येणार अशी सुद्धा माहिती मंत्री महोदयांकडून समोर आली आहे.
यावेळी मंत्री भोयर यांनी योजनेसाठी प्राप्त अर्जाची छाननी करण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती असून समितीकडून प्रस्ताव संचालकांना सादर होण्यामध्ये वेळ लागत होता. त्यामुळे आता याची कार्यवाही शालेय शिक्षण विभाग स्तरावर करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे.
या योजनेसाठी अर्थसंकल्पीय निधीपैकी 60 टक्के निधी वर्षाच्या सुरुवातीस संचालकांना उपलब्ध करून दिला जाईल अशीही माहिती समोर येत आहे. राजीव गांधी विद्यार्थी सानूग्रह अनुदान योजनेसाठी सद्यस्थितीला पालकांच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवले जात आहे.
पण आता यानंतरच्या प्रकरणांमध्ये संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रस्ताव पाठवले जाणार आहेत. मुख्याध्यापकांना स्वतः याचे प्रस्ताव तयार करून पाठवावे लागणार आहेत. नक्कीच सरकारने घेतलेला हा निर्णय अनेकांसाठी दिलासादायी ठरणार असून या निर्णयाचे साऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.