Homeमहाराष्ट्रजुगार्‍यांवर छापा; 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगार्‍यांवर छापा; 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

पाचगाव-गिरगाव रस्त्यावर एका घरात तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 13 जणांना अटक केली. कारवाईत 33 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 7 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 च्या सुमारास अण्णा पाटीलनगर, पाचगाव येथे संजय भोटे-बोटे याच्या घरात ही कारवाई करण्यात आली.

 

अटक केलेल्यांत एका सराफ व्यावसायिकासह माजी नगरसेविकेच्या मुलाचा समावेश आहे.

 

जुगार अड्डामालक संतोष गायकवाड (रा. जोशीनगर झोपडपट्टी, संभाजीनगर), घरमालक संजय बाबुराव भोटे-बोटे (वय 40, रा. अण्णा पाटीलनगर, पाचगाव) याच्यासह सराफ व्यावसायिक कुणाल रणजित परमार (36, रा. कासार गल्ली, गुजरी), माजी नगरसेविकेचा मुलगा सागर खंडू कांबळे (30, रा. राजेंद्रनगर), अरविंद सखाराम कुचेकर (29, रा. आराम चौक शेजारी, राजेंद्रनगर), अनिकेत बळवंत कदम (32, रा. येवलूज, ता. पन्हाळा), प्रकाश विष्णू बुचडे (32, रा. माळवाडी, ता. येवलूज, ता. पन्हाळा), उत्तम राजेंद्र भोसले (42, रा. उद्यमनगर, मेन रोड), अतिष गोरोबा कांबळे (30, रा. जोशीनगर झोपडपट्टी), सौरभ अशोक पोवार (29, रा. घिसाड गल्ली, सोमवार पेठ), योगेश मोहन सूर्यवंशी (35, रा. घिसाड गल्ली, सोमवार पेठ), अमोल बुकशेट (रा. कसबा बावडा), रवी सोनटक्के (रा. राजेंद्रनगर) आदींचा अटक केलेल्यांत समावेश आहे. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -