Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रमोठं संकट! 16, 17, 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला अलर्ट जारी, थेट...

मोठं संकट! 16, 17, 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला अलर्ट जारी, थेट मोठा इशारा, राज्यात पुढील 24 तास…

राज्यासह देशात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला जोरदार पाऊस झाला. त्यानंतर साधारण दुसऱ्या आठवड्यानंतर गारठा सुरू झाला. राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आलाय. आता देशावर दुहेरी संकट असल्याचे बघायला मिळत आहे. काही राज्यात पावसाचा इशारा तर काही राज्यांमध्ये थेट थंडीच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. वातावरणात सतत बदल होत आहे. महाराष्ट्रात सध्या गुलाबी थंडीचे आगमन झालंय. राज्यात किमान तापमान 10 अंशांच्या खाली घसरल्याने गारठा जाणू लागला आहे. निफाड, जळगाव आणि जेऊरमध्ये 10 अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.

 

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता असून गारठा वाढेल. पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर या भागात थंडीची लाट आलीये. भारतातील मान्सूनचा पाऊस कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, ज्यामुळे पुढील काही दिवस आता दक्षिण भारतात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसा इशाराही भारतीय हवामान विभागाने दिलाय.

 

केरळमध्ये पुढील काही दिवस पाऊस बघायला मिळेल. 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळ, विजांचा कडकडाट यासोबतच पुराचा धोका देखील असणार आहे. उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील तीन ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास केरळसाठी अत्यंत धोकादायक आहेत.

 

फक्त केरळच नाही तर आंध्र प्रदेशला देखील मोठा धोका आहे. 17 ते 18 नोव्हेंबरला किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. 16, ते 20 नोव्हेंबरला हलका ते मध्यम पाऊस होईल. समुद्रात धोका असून मच्छिमारांनी मोठा इशारा देण्यात आला. हवामान खात्याने सांगितले की, अंडमान निकोबार या भागातही पुढील 5 दिवस अधूनमधून मध्यम ते मुसळधार पाऊस होईल. तामिळनाडूमध्येही पावसाचे संकेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -