दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. विजयासाठी दिलेल्या 124 धावा भारताला करता आल्या नाहीत. हा सामना भारताने 30 धावांनी गमावला. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला काहीही करून दुसरा कसोटी सामना जिंकणं भाग आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताचं टेन्शन वाढलं आहे. कारण शुबमन गिल या सामन्यात खेळणार की नाही हे स्पष्ट नाही. कारण अजूनही तो दुखापतीतून सावरलेला नाही. गिलला कोलकात्यात गंभीर दुखापत होत होती. त्यामुळे रिटायर्ड हर्ट झाला होता.
गिल पहिल्या डावात 4 धावा करून रिटायर्ड हर्ट झाला आणि त्यानंतर फलंदाजीला उतरलाच नाही. त्यानंतर कोलकात्यातील एका रुग्णालयात त्याला भरती केलं गेलं. त्यामुळे दुसऱ्या डावातही फलंदाजीला उतरला नाही. त्याचा फटका टीम इंडियाला बसला असंच म्हणावं लागेल.
शुबमन गिल दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही? असा प्रश्न आहे. याबाबत गौतम गंभीरने अपडेट दिले आहेत. गौतम गंभीरने सांगितलं की, गिलच्या स्थितीवर नजर ठेवून आहोत. टीमच्या फिजियोचा निर्णय घेऊ आणि त्यानंतर ठरवू. खेळणार की नाही? हे त्यानंतरच ठरेल.
भारताचा दुसरा कसोटी सामना गुवाहाटीत 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी सामना होत आहे. जर गिल या सामन्यात खेळू शकला नाही तर उपकर्णधार ऋषभ पंतला संघाची धुरा सांभाळावी लागेल. पंतही नुकताच दुखापतीतून सावरून आला आहे.




