तुम्ही जिओचे ग्राहक असाल आणि तुम्ही एका चांगल्या डेटा प्लॅनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज आपण एका अशा प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो.
जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो. तसेच यात अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील मिळतात. ज्या लोकांना जास्त मोबाइल इंटरनेटची गरज असते त्यांच्यासाठी हा प्लॅन खास आहे.
जिओच्या या प्रीपेड प्लॅनची किंमत 399 रुपये आहे. यात 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईलचे सबस्क्रिप्शन मिळते. यात तु्म्ही चित्रपट विविध शो आणि क्रीडा सामन्यांचा आनंद घेऊ शकता.
हा रिचार्ज प्लॅन 28 दिवसांच्या व्हँलिडीटीसह येतो. रिचार्ज जिओच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे करता येतो. तसेच युपीआय अॅप्सद्वारेही हा रिचार्ज करता येतो.
399 रुपयांचा हा प्लॅन दररोज इंटरनेटची गरज असलेल्या ग्राहकांसाठी आहे. यात मिळणारे इतर फायदेही खूप खास आहेत. त्यामुळे हा प्लॅन खूप लोकप्रिय झाला आहे.




