छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री माही विज हिचा जय भानुशालीसोबत नुकताच घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाची ही बातमी समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावरील ट्रोलर्सने माही विजचे नाव नदीम नाज याच्याशी जोडण्यास सुरुवात केली आहे. नदम नाज हा माही विजचा बेस्ट फ्रेंड आहे.
दरम्यान, माही विजचे नाव नदीम नाजशी जोडले जात असल्याने माहीची मैत्रीण असलेली अंकिता लोखंडे चांगलीच भडकली आहे. तिने माही विजच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करत ट्रोलर्सना चांगलेच सुनावले आहे.
तसेच माही विजचे नाव नदीमशी जोडले जात आहे. परंतु ते चुकीचे आहे, असेही अंकिताने सांगितले आहे. काही दिवसापूर्वी नदीम नाजच्या वाढदिवसाचे निमित्त साधत माही विजने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट केली होती.
या पोस्टमध्ये नदीम हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, असे माही म्हणाली होती. तेव्हापासूनच नेटकरी, ट्रोलर्स माही विजचे नाव नदीमशी जोडत होते. त्यानंतर आता अंकिता लोखंडेने समोर येत मोठी पोस्ट केली असून ती चांगलीच भडकली आहे.





