वृंदावन येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे.एका तरुणाने मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना व्हीआयपी दर्शनाचं आमिष दाखवलं. त्यानंतर त्यांना हॉटेलमध्ये नेत अश्लील व्हिडीओ बनवले आणि त्यांना ब्लॅकमेल करत हॉटेलवर नेल्याचा आरोप करण्यात आला. याआधीही आरोपी तरुणाने अनेक मुली आणि महिलांसोबत असेच कृत्य केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचं नाव प्रिन्स वर्मा असे आहे. तो केशीघाट येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहे.
काय घडलं नेमकं?
प्रिन्स वर्मा आणि तक्रारदार महिलेची भेट सुमारे एका वर्षांपूर्वी झाली होती. आरोपीने बांके बिहारी मंदिरात व्हिआयपी दर्शन देण्याच्या बहाण्याने तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. नंतर त्याने हळूहळू तिला लग्नाचे आमिष दाखवून लग्नाचे आश्वासन देत फसवले. त्यानंतर आरोपीने शॉपिंग आणि कॉफीच्या बहाण्याने तिला फोन केला होता. प्रिन्सने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला. व्हिडिओ बनवल्यानंतर आरोपीची खरी ओळख समोर आली आणि तिच्याकडून तब्बल 1 लाख रुपयांची मगाणी करू लागला. या पीडितेनं नकार दिल्यानंतर आरोपीने सर्व परिसीमा ओलांडल्या आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल केले होते. व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
आरोपी अटकेत
पीडितेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपी प्रिन्स वर्माला अटक केली. तसेच नंतर छापे देखील टाकण्यात येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.
अंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल, लैंगिक शोषणानंतर पीडित महिलेची छतावरून उडी
उत्तरप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. हाथरस गावातील महिलेचे एका तरुणाने अंघोळ करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या लैंगिक संबंध ठेवले. जेव्हा महिलेच्या पाटील याची माहिती मिळाली तेव्हा त्याने तिला घराबाहेर काढले. या सगळ्याला कंटाळून महिलेने त्यांच्या घराच्या छतावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती यात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहे.




