Thursday, January 22, 2026
Homeमहाराष्ट्रजन्मदात्या आईने पोटच्या गोळ्यावर तब्बल 17 वेळा चाकूने केले सपासप वार; चिमुरडीच्या...

जन्मदात्या आईने पोटच्या गोळ्यावर तब्बल 17 वेळा चाकूने केले सपासप वार; चिमुरडीच्या तोंडातही खूपसला चाकू, उंबरठा रक्ताने…

लातूर शहरातील श्यामनगर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडलीये. पती घरी उशिरा परतल्याच्या रागातून एका आईने आपल्या दीड वर्षांच्या (१८ महिन्यांच्या) चिमुरडीची निर्दयीपणे हत्या केल्याने संपूर्ण शहर हादरले आहे.

 

अश्विनी चौगुले असे आरोपी महिलेचे नाव असून, तिने नंदिनी नावाच्या आपल्या मुलीवर चाकूने सपासप वार करत तिचा जीव घेतला.

 

या प्रकरणात पोलिसांनी अश्विनीला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. तिच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्यासाठी तिला सुमारे ३० तास मानसोपचार तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

 

कोणत्याही मानसिक आजारामुळे नव्हे, तर केवळ रागाच्या भरात तिने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मूळचे हासेगाव येथील चौगुले कुटुंब रोजगाराच्या शोधात लातुरात आले होते. कुटुंबप्रमुख विक्रम चौगुले हे उसाच्या ट्रॅक्टरवर काम करून उदरनिर्वाह करत होते.

 

मुलीवर तब्बल १७ वेळा चाकूने वार

 

१९ जानेवारीच्या सकाळी घरात वाद झाला आणि त्याचे भीषण रूपांतर या अमानुष घटनेत झाले. अश्विनीने आपल्या दीड वर्षांच्या मुलीवर तब्बल १७ वेळा चाकूने वार केले. इतकेच नव्हे, तर तिने चिमुरडीच्या तोंडातही चाकू खुपसल्याचे समोर आले असून, त्या कोवळ्या जीवाचा जागीच मृत्यू झाला.

 

घराचा उंबरठा माखलेला रक्ताने

 

दरम्यान, अश्विनीचा चार वर्षांचा मुलगा राजवीर याने हे सगळे आपल्या डोळ्यांसमोर पाहिले. आईकडूनच लहान बहिणीची हत्या होताना पाहिल्याने त्या बालमनावर खोल जखम झाली आहे. विक्रम चौगुले घरी परतले तेव्हा घराचा उंबरठा रक्ताने माखलेला, मुलगी मृतास्थेत पडलेली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली असून, समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपी महिलेविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -